दीपिका पदुकोन आणि करिना कपूरमध्ये जोरदार टेंशन

दोन हॉट अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि करिना कपूरमध्ये सध्या जोरदार टेंशन सुरू आहे. या दोघींमध्ये बिनसण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट होय. करिनाने तारखांच्या घोळामुळे हा चित्रपट नाकारला. त्यामुळे रोहितने करिनाऐवजी  दीपिकाला साइन केले. यामुळे या दोघींमध्ये  ङ्गाइटला सुरुवात झाली. तसेच काही दिवसांपूर्वी या दोघींमध्ये चांगलेच भांडण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रोहितच्या गोलमाल सिरीजमध्ये करिना ही मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे या नव्या सिनेमासाठी रोहित आपली वाट बघेल असे करिनाला वाटले होते. मात्र, रोहितने दीपिकाला साइन करत तिला धक्का दिला.‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे ‘ओम शांती ओम’ नंतर दीपिकाला शाहरुखबरोबर पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Comment