.jpg)
वॉशिग्टन-अमेरिकेत १५ टक्के लोक दारिद्द्य रेषेखाली राहतात.मात्र,मागील महामंदीने अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा झटका दिला होता.सध्या निम्म्या अमेरिकन नागरिकांचा आर्थिकस्तर उंचावला असूनही त्यांची बचत शून्य आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकाला आणखी एका मंदीचा झटका बसला तर निम्मा देश कंगाल होण्याची शक्यता आहे, असे अमेरिकी थिक टँक, कॉर्पोरेशन फॉर इंटरप्राइज डेवलपमेंट या संस्थेची संचालक जेनिफर ब्रुक्स यांनी येथे सांगितले. अनेक अमेरिकन नागरिक सध्या आपल्या बचतीवर जगत आहे. त्यांची ही बचत जास्त दिवस त्यांना चालविता येणार नाही, असे त्या म्हणाल्या.
