अडीच हजाराहून अधिक एस.टी कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी

पुणे-माथेफिरू एसटी बसचालक संतोष मानेने स्वारगेट बसस्थानकावर घडविलेल्या थरारनाट्यानंतर जागी झालेल्या एसटी महामंडळाने  चालकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली होती . शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन आदी  आगारांत या तपासणी आता अंतिम टप्यात आली असल्याची माहिते सुत्रांनी दिली.
प्रत्येक डेपोमधील बसगाड्यांचे वेळापत्रक विस्कळित न करता ही तपासणी करण्यात येत आहे. एसटी चालकांची मानसिक स्थिती आणि त्यांची कार्यक्षमता ही परस्परावलंबी असते, यामुळे राज्यातील सर्व चालकांची  प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या अंतर्गत पुणे विभागातील २ हजार ७९ चालकांची आरोग्य तपासणी होणार आहे.
 चालकांच्या या प्राथमिक आरोग्य तपासणीत हृदयरोग, रत्त*दाब, डायबेटिस, डोळे यांची तपासणी करण्यात आली आहे, तपासणी अहवाल विभागीय कार्यालयात जाणार असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणर आहे. डॉ*टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दोन चालकांना नेत्र दोषामुळे सध्या थांबविण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर आणि डॉ*टरांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतरच महामंडळ त्यांची सेवा घेणार आहे. उपचाराचा खर्च महमंडळा अणि कर्मचारी नियमाप्रमाणे करणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.