जॉन अब्राहम घेतोय मराठीचे धडे

अंडरवर्ल्ड आणि बॉलीवूडचे नाते हे जुनेच आहे. गुन्हेगारी जगतावर आजवर अनेक चित्रपट आले आहेत. २००७ हिट झालेल्यामध्ये ‘शूटआऊट अँट लोखंडवाला’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘शूटआऊट अँट वडाळा’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जॉन अब्राहम हा एका मराठी गँगस्टरची भूमिका साकारत असून तो यासाठी खास मराठीचे धडे महेश मांजरेकर यांच्याकडून गिरवत आहे.
मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वेचा १९८२ साली  एन्काउंटर पोलिसांनी केला होता. या आधारावरच या चित्रपटाची कथा आहे. तसेच जॉन चित्रपटात मराठी गँगस्टरची भूमिका रंगवत आहे. दिग्दर्शनाची धुरा ही संजय गुप्ता यांच्यावर आहे. तसेच जॉनने आजवर अशा धाटणीची आणि मराठी बोलीभाषेची ंभूमिका साकारली नाही. त्यामुळे तो सध्या महेश मांजरेकर यांच्याकडून मराठी शिकत आहे. चित्रपटात जॉनसोबतच, अनिल कपूर, कंगना राणावत आणि रोहित रॉय यांच्या भूमिका आहेत. शूटआऊट अँट लोखंडवाला या चित्रपटात माया डोळसच्या भूमिकेला विवेक ओबेरॉयने अतिशय चांगल्या प्रकारे रंगवले होते. तसेच त्याच्या भूमिकेचे खूप कौतुकही झाले होते. त्यामुळे आता जॉनपुढे मराठी गँगस्टरच्या पात्राला न्याय देण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील, असे चित्रपट जाणकारांना वाटते.