इस्रायलच्या वाहनात स्फोट

नवी दिल्ली-  भारतातल्या इस्रायलच्या वकिलातीतली एक इनोवा कार पंतप्रधान मनमोहनसिग यांच्या घरा पासून जवळच एका स्फोटकांचा स्फोट होऊन जळाली.या अपघातात चौघे जखमी झाले असून त्यात इस्रायली वकिलातीतल्या एका महिला कर्मचार्‍याचा समावेश आहे. हा प्रकार पंतप्रधानांच्या घराजवळ एका पेट्रोलपंपावर घडला. स्फोट झाल्या बरोबर करण्यात आलेल्या अंदाजात  या गाडीतल्या सीएनजीच्या स्फोटामुळे हा प्रकार घडला असल्याचे सांगितले गेले होते पण नंतर कळलेल्या माहितीत ही गाडी गॅसवर चालत नव्हती असे समजले.  त्यामुळे हा घातपातच आहे या संशयाला बळकटी येत आहे. काही प्रत्यक्ष दर्शनी या संशयाला दुजोरा दिला आहे. ही गाडी पेट्रोल पंपाजवळून जात होती तेव्हा दोन तरुण मोटार सायकलवरून जात तिचा पाठलाग करीत होते. त्यातल्या मागच्या आसनावर बसलेल्या तरुणाने या गाडीवर काही तरी टाकले तेव्हाच स्फोट झाला आणि त्यात गाडी भस्मसात झाली.
    असाच एक प्रकार कालच जॉर्जियातही घडला आहे आणि तिथेही हा स्फोट इस्रायलच्या गाडीतच झाला आहे. त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या काही दहशतवादी गटांचाच घातपात असावा असे समजले जात आहे.या इनोव्हा गाडीच्या बाजूला दुसरी गाडी होती. तीही जळून खाक झाली. या प्रकारात जखमी झालेल्या चौघांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यात इस्रायली वकिलातीत नुकतीच नोकरीला लागलेली ४२ वर्षाची एक प्रशासन अधिकारी महिला असल्याचे लक्षात आल.

Leave a Comment