फेसबुकचे मजेशीर फीचर लाँच; आता बनवा स्वतःचा ‘अ‍ॅनिमेटेड अवतार’


सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्ससाठी एक खास मजेशीर फीचर आणले आहे. फेसबुक युजर्स या फिचरद्वारे स्वतःचे व्हर्च्युअल कार्टून किंवा अ‍ॅनिमेटेड कॅरेक्टर बनवू शकतात. फेसबुक अ‍ॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ‘Avatars’ नावाचे नवीन फीचर देण्यात आले आहे.

अनेक चेहरे, हेअर स्टाइल आणि आउटफिट्सला फेसबुकचे हे नवीन फीचर सपोर्ट करते. हे फीचर भारतीय युजर्सच्या दृष्टीकोनातून कस्टमाइज करण्यात आल्याचे फेसबुककडून सांगण्यात आले आहे. या फिचरच्या सहाय्याने एकदा अॅनिमेटेड अवतार बनवल्यानंतर युजर याच्या मदतीने आपल्या चेहऱ्याचे स्टिकर्स मेसेंजरवर पाठवू शकतात आणि याचा वापर कमेंट्समध्येही करता येईल. या फीचरची गेल्या वर्षापासून कंपनी चाचणी घेत होती.

हे फिचर वापरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फोनमधील फेसबुक आणि मेसेंजर अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जनसह अपडेट करावे लागेल. हे फीचर या अ‍ॅप्सच्या Lite व्हर्जनवर काम करणार नाही हे ध्यानात ठेवा. व्हर्जन अपडेट केल्यानंतर तुम्हाला अनेक ठिकाणी अवतार क्रिएट करण्याचा पर्याय मिळेल. कमेंट सेक्शनमध्ये Smily आयकॉनवर टॅप केल्यानंतर Make your Avatar असा पर्याय दिसेल. याशिवाय फेसबुक अ‍ॅप ओपन केल्यानंतर कोपऱ्यात असलेल्या तीन लाइनच्या ‘हॅमबर्गर आयकॉन’वर टॅप करु शकतात.

Leave a Comment