चीनच्या राष्ट्रपतींशी मिळता-जुळता चेहरा असल्याने या व्यक्तीला टीक-टॉक वापरण्यास बंदी

चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होणे ही काही नवीन गोष्ट नाही. मात्र येथे जर तुम्ही राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या सारखे दिसत असाल, तर त्याची देखील तुम्हाला किंमत मोजावी लागू शकते. चीनच्या एका प्रसिद्ध ओपेरा गायकाचा चेहरा जिनपिंग यांच्याशी मिळत असल्याने या गायकाला एकप्रकारे सोशल मीडिया वापरण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.

Image Credited – dailymail

चीनचे प्रसिद्ध ओपेरा गायक लिउ केकिंग यांचा चेहरा जिनपिंग यांच्याशी मिळता-जुळता आहे. यामुळे चीनच्या सरकारने त्यांच्या सोशल मीडिया वापरावर प्रतिबंध घातले आहेत. ते चीनच्या राष्ट्रपतींच्या चेहऱ्याचा फायदा उचलत असल्याचे, त्यांना सांगण्यात आले आहे. 63 वर्षीय लिउ यांना टीकटॉक वापरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

Image Credited – The New York Times

लिउ केकिंग बर्लिनमध्ये राहतात. आपले ओपेरा गातानाचे त्यांनी अनेक व्हिडीओ टीक-टॉकवर शेअर केलेले आहेत. टीक-टॉकवर त्यांचे 41 हजार फॉलोअर्स आहेत. मात्र त्यांचे अकाउंट अनेकदा बंद करण्यात आले आहे. लिउ यांनी 10 मे ला एक व्हिडीओ टाकत सांगितले की, त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले आहे. इमेज वॉयलेशनमुळे असे करण्यात आले.

लिउ यांनी लिहिले की, माझे Douyin (टीक-टॉक) अकाउंट बंद करण्यात आले आहे. कारण माझा चेहरा राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मिळता जुळता आहे. मी अनेकदा माझी ओळख चीन सरकारला सांगितली आहे. माझे अकाउंट पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत आहे. लिउ यांनी टीक-टॉकवर दुसरे अकाउंट देखील बनवले. मात्र ते अकाउंट देखील काही वेळात बंद झाले.

Leave a Comment