
बिजिंग – खास हाँगकाँगसाठी बनवण्यात आलेला राष्ट्रीय सुरक्षा कायदा चिनी संसदेमध्ये आज मंजूर झाल्यामुळे चीनचा संपूर्ण हाँगकाँगवर कब्जा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २३ वर्षांपूर्वी कधीकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेले हाँगकाँग चीनकडे सोपवण्यात आले. चीनच्या नियंत्रणाखाली हाँगकाँग असले तरी तिथे वेगळे कायदे असल्यामुळे आपल्या पद्धतीने तिथे चीनला कारभार करता येत नव्हता.
चिनी संसदेत मंजूर झाला हाँगकाँगवर पूर्णपणे ताबा मिळवणारा कायदा
हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे. हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली हाँगकाँग आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. लोकशाही हक्कांसाठी तेथील जनता जागरुक असल्यामुळे हाँगकाँगमध्ये चीनचे सर्व कायदे लागू होत नाहीत. मागच्यावर्षी हाँगकाँगमध्ये लोकशाही हक्कांसाठी हिंसक आंदोलन झाले होते.
