59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्याने भडकलेल्या चीनने भारतीय वेबसाईट्स केल्या बॅन

भारत सरकारद्वारे 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर भडकलेल्या चीनने आता आपल्या देशात भारतीय वेबसाईट्सवर प्रतिबंध लावले आहेत. भारतीय माध्यमांद्वारे आपल्या विरोधातील रिपोर्टिंगमुळे चिडलेल्या चीनने भारतीय प्रसार माध्यमांच्या वेबसाईट्सला बीजिंगमध्ये ब्लॉक केले आहे.

अमर उजालाच्या वृत्तानुसार, भारतीय टिव्ही चॅनेल्सला आयपी टिव्हीच्या माध्यमातून पाहता येत आहे. मात्र एक्सप्रेसव्हीपीएनद्वारे मागील दोन दिवसांपासून आयफोन आणि डेस्कटॉपवर उघडत नाही.

या स्थितीमध्ये व्हीपीएन महत्त्वाचे ठरत आहे. याच्या मदतीने सेंसरशिप असताना देखील कोणत्याही विशेष वेबसाईटला एक्सेस करता येत आहे. मात्र चीनने यावर देखील पर्याय शोधला असून, त्यांनी एक हायब्रिड फायरवॉल तयार केले आहे, जे व्हीपीएनला देखील ब्लॉक करण्यास सक्षम आहे.  या खास फायरवॉलला चीनने ग्रेट फायरवॉल असे नाव दिले आहे. चीनने या आधी देखील गुगल, फेसबुकसह अनेक अमेरिकन वेबसाईट्सवर बंदी घातली आहे.

Leave a Comment