Unlock 2.0 साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली नवी मार्गदर्शक तत्त्वे - Majha Paper

Unlock 2.0 साठी केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली नवी मार्गदर्शक तत्त्वे


नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनमध्ये सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली असून लॉकडाऊनचा हा सहावा टप्पा ३१ जुलपर्यंत कायम राहणार आहे. पण या सहाव्या टप्प्यात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून, हा अनलॉकचा दुसरा टप्पा असेल. दरम्यान सोमवारी रात्री केंद्रीय गृहमंत्रालयाने सहाव्या टप्प्यातील लॉकडाउनसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या टप्प्यात कॅन्टोन्मेट झोन वगळता शहराच्या अन्य भागांमध्ये अधिकाधिक आर्थिक व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे.

आर्थिक व्यवहारांचा विस्तार नव्या टप्प्यात केला जाईल. त्याचबरोबर यावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकाच वेळी येऊ शकतील, अशी मोठी दुकाने उघडली जाऊ शकतील. १५ जुलैपासून केंद्रीय व राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था सुरू होणार असून त्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान केंद्राच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार

  • ३१ जुलैपर्यंत शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाने बंद राहणार आहेत.
  • ऑनलाइन डिस्टन्स लर्निंगला परवानगी कायम आणि चालनाही देण्यात येईल.
  • आंतरराष्ट्रीय प्रवासाला गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय मुभा नाही.
  • मेट्रो आणि रेल्वे सेवा राहणार बंदच राहणार
  • चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल, पार्क, बार, असेंबली हॉल आणि अशाप्रकारच्या जागांवरील बंदी कायम.
  • सामाजिक/राजकीय/खेळ/धार्मिक कार्य/मनोरंजन/सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदी कायम.
  • १५ जुलैपासून कन्टेन्मेंट झोनच्या बाहेर केंद्र आणि राज्य प्रशिक्षण संस्था कार्यरत ठेवण्याची परवानगी
  • त्याचबरोबर केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्सनुसार नाईट कर्फ्यू कायम ठेवला आहे. परंतु अत्यावश्यक सेवांच्या परिचालनासाठी परवानगी देण्यात आली आहे. नाईट कर्फ्यूची वेळही कमी करण्यात आली असून आता ती रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत असणार आहे.

Leave a Comment