हिंगोली : पोलिस निरीक्षक मुंगळीकर, गौर यांना विशेष सन्मानचिन्ह

हिंगोली १७ मार्च – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलिस स्थानकामध्ये पूर्वी कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व डॉ विवेक मुंगळीकर यांना उत्कृष्ठ कामगिरीबद्दल विशेष पोलिस महासंचालकांचे विशेष सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे

पोलिस खात्यामध्ये विशेष कामगिरी व प्रशासकीय सेवेमध्ये १५ वर्ष पूर्ण करणार्यात पोलिस अधिकारी व कर्मचार्यांवना महाराष्ट्रदिनी विशेष सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येते आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात कार्यरत असताना अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करणारे व सध्या जालना येथे कार्यरत असलेले राजेंद्रसिंह गौर यांचा विशेष सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व आताचे पोलिस निरीक्षक डॉ विवेक मुंगळीकर यांचाही सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.

Leave a Comment