परभणी : आरोग्य अधिकाऱ्याच्या जीपची चाकेच गायब होतात तेव्हा…

परभणी १७ मार्च – जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याजवळ असलेल्या शासकीय जीपची चाके अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरुण बनसोडे यांच्याकडे शासनाकडून देण्यात आलेले टाटा सुमो हे वाहन आहे.ही गाडी जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालयासमोर लावण्यात आली होती.अज्ञात चोरट्यांनी टाटा सुमोला जॅक लावून गाडीचे मागचे दोन टायर तसेच एक स्टेफनी डिस्क असा माल चोरुन नेला.बनसोडे कार्यालयातून बाहेर आल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला.याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास एपीआय कदम करीत आहेत.

Leave a Comment