परभणी १६ मार्च – मानवत तालुक्यातील कोल्हा पाटीपासून जवळ असलेल्या ताडबोरगाव शिवारातील पेट्रोलपंप मालकास वाटेत दगडफेक करून बेदम मारहाण करीत पैशाची बॅग दरोडेखोरांनी पळवून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली.शहरातील गांधीपार्क येथील रहिवाशी असलेले राजेंद्र पुरणमल जैन यांचा ताडबोरगाव शिवारात मानवत रोडवर पेट्रोलपंप आहे.
परभणी : पेट्रोलपंप मालकावर हल्ला करून पैशाची बॅग पळविली
नेहमीप्रमाणे जैन व त्याच्या पंपावर काम करणारे अब्दुल, इस्माईल असे तिघेजण हिरोहोंडा मोटारसायकलवरुन परभणीकडे निघाले होते. काही अंतरावर गेल्यावर झुडपातून त्यांच्यावर प्रचंड दगडफेक झाली. ते खाली पडले असता झुडपातून बाहेर आलेल्या लोकांनी त्यांना लाठ्या, काठ्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत त्या दिवशी गल्ल्यात जमा झालेले ४० ते ५० हजार रु. होते. याबाबत गुन्हा दाखल झाला असून स्थानिक पोलिस तपास करीत आहेत.
