हिंगोली : कॉपीमुक्त परिक्षेच्या अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांकडून जातीने लक्ष

हिंगोली १६ मार्च – दहावीच्या परिक्षेत जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही,यासाठी जिल्हाधिकारी शैला रॉय यांनी मंगळवारी शहरातील अनेक शाळांना भेटी दिल्या.सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असून या परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे पार पडत आहेत.

इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी केवळ एका परिक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्यांस रस्टीकेट करण्यात आले होते. मंगळवारी भूमिती विषयाचा पेपर असल्यामुळे जिल्हाधिकारी शैला रॉय यांनी शहरातील जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल, शांताबाई दराडे माध्यमिक विद्यालय, माणिक स्माकर आर्य विद्यालय, सरजुदेवी विद्यालय या शाळांना भेटी दिल्या. कळमनुरी येथील काही परीक्षा केंद्रांनाही त्यांनी भेटी दिल्या. कॉपीमुक्त अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असून हे अभियान यशस्वीपणे राबविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

Leave a Comment