मुंबई १५ मार्च – मालाडमध्ये महिला दिनी निधी गुप्ता या महिलेने आपल्या दोन मुलांसह १९ व्या मजल्यावरुन उडी मारुन केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तिचा पती पवन गुप्ता याला अटक केली. पवन हा पोलिसांना चकमा देत आपल्या घरातून फरार झाला होता.
मुंबई : निधी गुप्ताच्या पतीला आत्महत्येप्रकरणी अटक
मालाड-पूर्वेला असलेल्या सह्याद्री टॉवर्सच्या १९ व्या मजल्यावरुन उडी मारुन चार्टर्ड अकाऊंटट निधी गुप्ता हिने आत्महत्या केली होती. स्वतः उडी मारण्यापूर्वी तिने गौरव व महिका या आपल्या चिमुकल्यांना १९ व्या मजल्यावरुन ढकलले होते. सदर घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी निधीचा पती पवन, दीर राकेश, जाऊ सुनीता व सासू-सासरे अशा पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. निधीचे वडील बिमल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सर्व आरोपींविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आले होते. पण ही बातमी मिळताच पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी गुप्ता कुटुंबिय फरारी झाले होते. मंगळवारी पोलिसांना मुख्य आरोपी पवन गुप्ता याला अटक करण्यात यश आले. शेअर ब्रोकर असलेल्या निधीच्या वडिलांनी पवन गुप्ता याच्या कुटुंबियांच्या गारमेंट्सच्या व्यवसायात गुंतवणूक करावी, असा पवनच्या कुटुंबियांचा आग्रह होता.
