
नवी दिल्ली – उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या हेल्पलाईन सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी असलेला संदेश पाठविण्यात आला आहे. हा धमकीचा संदेश पाठविणार्या अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री योगींचे वर्णन एका विशिष्ट समुदायासाठी धोकादायक असल्याचे म्हटे आहे. लखनऊच्या गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हॉट्सअॅप मेसेज गुरुवारी रात्री उशिरा सुमारे सव्वाबाराच्या सुमारास पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डायल 112 च्या सोशल मीडिया डेस्कच्या व्हॉट्सअॅप नंबर 7570000100 वर हा संदेश आला आहे. मुख्यमंत्री योगींना मी बॉम्बने उडवून देणार असल्याचे संदेशात लिहिले आहे. दरम्यान हा मॅसेज मिळताच उत्तर प्रदेश पोलीस सतर्क झाले असून हा संदेश नेमका कुणी पाठवला याचा तपास सध्या सुरु आहे.
