मार्क झकेरबर्गची घोषणा; आगामी काळात कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावे


नवी दिल्ली – सोशल मीडिया क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फेसबुकने लॉकडाऊन लक्षात घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात म्हणजे 2030 पर्यंत घरातूनच कार्यालयीन काम करा असा, निर्णय जाहिर करून टाकला आहे. त्यासोबतच वर्क फ्रॉम होम पॉलिसीचे समर्थनही फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्गने केले आहे.

ज्यावेळी तुमच्या क्षेत्रातील लॉकडाऊन संपल्याची घोषणा केली जाईल, त्यानंतर सुरुवातीला केवळ २५ टक्केच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांना घरुन काम करायचे आहे, त्यांना जानेवारी २०२१ आधी त्यांचे लोकेशन कंपनीला द्यावे लागणार आहे. फेसबुक या काळात १०,००० नवीन इंजिनिअर भरती करणार आहे. त्याचबरोबर अटलांटा, डग्लस आणि डेन्वरमध्ये कंपनी नवीन हबही उभारणार आहे. यामध्ये अधिकाधिक इंजिनिअरना नोकरी दिली जाणार आहे. तसेच पोर्टलँड, सॅनडियागो येथील कार्यालयांमध्ये फेसबुक अन्य कर्मचारी वर्गाचीही भरती करणार आहे. या योजनेची सध्या माहिती त्यांनी दिलेली नाही.

कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याची योजना फेसबुकआधी मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनेदेखील जाहीर केली होती. सध्याची परिस्थिती पाहता आपले कर्मचारी त्यांना वाटेल तेवढे दिवस घरून काम करू शकतात. परिस्थितीत सुधारणा झाली तरीहीदेखील त्यांना परवानगी दिली जाईल, असे म्हटले होते.

Leave a Comment