जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. अशा स्थिती लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांकडून वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जात आहेत. पेरूमध्ये असेच काहीसे विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे तंतारा शहराचे महापौर जेमिए रोलांडो यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्यानंतर अटक होण्यापासून वाचण्यासाठी भलतीच शक्कल लढवली. ते कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे नाटक करत, चक्क शवपेटीतच झोपले.
लॉकडाऊनमध्ये हा महापौर करत होता पार्टी, पोलीस आल्यावर चक्क येथे जाऊन लपला
महापौर जेमिए रोलांडो यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन करत मित्रांसोबत दारू पिली. या पार्टीचे फोटो समोल आल्यानंतर, पोलीस त्यांना अटक करण्यासाठी गेल्यावर ते शवपेटीत झोपले. यावेळी त्यांनी मास्क लावला होता.
पोलिसांचे म्हणणे आहे की, महापौरांनी आपल्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी कर्फ्यू, कायद्याचे उल्लंघन केले. अटक करताना देखील ते नशेत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यावर ते शवपेटीतच झोपले. भरपूर ड्रामेबाजीनंतर त्यांना अटक करण्यात आले. स्थानिकांनी देखील जेमिए रोलांडो यांच्यावर शहरात सुरक्षा उपाय लागू न केल्याचे आरोप केले आहे.