VIDEO: कॉफी महागात पडल्यामुळे सध्या ग्रीन टीलचा देतो प्राधान्य


भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने विनोदपूर्वक एका कप कॉफी आपल्याला खूपच महागात पडल्यामुळे सध्या मी ग्रीन टीलाच प्राधान्य देतो, असे म्हटले आहे. दिनेश कार्तिकसोबत इन्स्टाग्राम चॅट दरम्यान हार्दिकने हे वक्तव्य केले आहे. हार्दिक मागील वर्षाच्या कॉफी विथ करण शो बद्दल बोलत होते, जिथे महिलांवरील त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर टीका केली गेली होती.

हार्दिक म्हणाला, मी सध्या कॉफी पीत नाही, फक्त ग्रीन टी पितो. मी फक्त एकदा कॉफी प्यायलो आणि ती मला खूप महागात पडली. एवढी महाग कॉफी स्टारबक्समध्ये देखील मिळत नाही. त्या प्रकरणानंतर मी कॉफीपासून दूर आहे. या लाइव्ह चॅट दरम्यान हार्दिकसोबत त्याचा भाऊ कृणाल पांड्याही होता. 2019 मध्ये हार्दिकने सलामीवीर लोकेश राहुलबरोबर कॉफी विथ करण शोमध्ये महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांना भारतीय संघातून निलंबित करण्यात आले होते.

त्याचबरोबर मोकळ्या स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम खेळणे हा एक चांगला पर्याय असेल असे वक्तव्य हार्दिक पांड्याने केले होते. पण कोरोनामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. दिनेश कार्तिकबरोबर इन्स्टाग्राम चॅटमध्ये हार्दिक म्हणाला, प्रेक्षकांशिवाय हा वेगळा अनुभव असेल. आम्हाला (आयपीएलमध्ये) प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय आहे. तो पुढे म्हणाला, प्रेक्षकांशिवाय मी रणजी ट्रॉफी खेळलो आहे आणि तो एक वेगळा अनुभव आहे. खरे सांगायचे तर, जर आयपीएल प्रेक्षकविना असेल तर तो एक चांगला पर्याय असेल. किमान घरी राहून लोकांचे मनोरंजन केले जाईल.

Leave a Comment