सोशल मीडियावर एक मांजर स्टार झाली आहे. वटवाघळासारखी दिसणारी ही मांजर सोशल मीडिया स्टार असून, तिचे नाव लूसी आहे. या मांजरीला न्यूरोलॉजिकल कंडिशन हा दुर्मिळ आजार आहे.
मांजरीची मालकीन झिल्ला बेर्गामिनीने लूसीला आपल्या एका मित्राकडून एक वर्षांपुर्वी घेतले होते. लूसीचे इंस्टाग्रामवर ‘लूसी द बॅट कॅट’ नावाचे एक पेज देखील आहे. या पेजवर तिचे 23 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
लूसी अवघ्या दोन महिन्यांची असताना इस्त्रायल येथील हैफा येथे नवीन घरात राहायला आली होती. सुरूवातीला लुसीच्या मालकीनीला तिच्या आजाराविषयी काळजी होती. मात्र दोघीही वर्षांपासून आता सोबत आहेत.
झिल्ला वेळोवेळी आपल्या लाडक्या मांजरीची तपासणी करते. दररोज लूसीच्या डोळ्यात औषध टाकावे लागते. झिल्ला यांच्याकडे आणखी मांजर आहे, जी लुसीची मैत्रिण आहे.
लुसीला आजार असला तरी ती इतर मांजरींप्रमाणेच खेळते. लूसीचे आता सोशल मीडिया स्टार झाली आहे.