कोरोना : जोडप्याने चक्क खिडकीत उभे राहून केले लग्न

कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण जग लॉक डाउन झाले असून, लोक घरात कैद झाले आहे. यामुळे एका जोडप्याने चक्क खिडकीत उभे राहून लग्न केले आहे. स्पेनमधील एक जोडपे मागील 1 वर्षांपासून लग्नाची तयारी करत होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण शहरच लॉक डाउन झाले आहे.

लग्नासाठी जोडप्याने आपल्या एका शेजाऱ्याला लग्नाचे नेतृत्व करण्यास आणि दुसऱ्या शेजारील्या विटनेस (साक्षीदार) बनवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवरदेव डेनियल केमिना आणि वधू अल्बा डियाज हे आपल्या घरातील खिडकीमधून बाहेर आले व एकमेंकाना लग्न मान्य आहे, असे म्हणत ‘आय डू’ असे . व्हिडीओमध्ये आजुबाजूचे लोक देखील जल्लोषात ओरडताना दिसत आहेत.  स्पेनमध्ये लॉक डाउनची परिस्थिती असल्याने दोघांना हा निर्णय घ्यावा लागला.

वेडिंग प्लॅनर असलेल्या डियाजने सांगितले की, त्यांच्या लग्नासाठी देशभरातून लोक येणार आहेत. मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

Leave a Comment