सुपर कॉम्प्युटरद्वारे झाली कोरोनाचे संक्रमण रोखणाऱ्या रसायनांची ओळख

कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असल्याने वैज्ञानिकांना वेगाने यावरील लस शोधण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी वैज्ञानिकांनी जगातील सर्वात वेगवान कॉम्प्युटर समिटची मदत घेतली आहे. कॉम्प्युटरने 77 औषधांच्या कंपाउंडची (रसायन) ओळख केली आहे. हे रसायन कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी सक्षम आहेत.

ऑर्टिफिशियल इंटेलिजेंसवर (एआय) आधारित सुपर कॉम्प्युटरने 77 रसायनांची ओळख केली आहे. हे कोरोना व्हायरसला शरीराच्या अन्य पेशींमध्ये पसरण्यापासून रोखते.

ऑक रिज नॅशनल लॅबोरेट्रीमध्ये प्रकासित जनरलमध्ये दावा करण्यात आला आहे की, याद्वारे तत्काळ परिणाम देणारे औषध बनवता येईल. कॉम्प्युटरचे काम प्रभावित करणाऱ्या पेशींची ओळख करणे आणि औषधांद्वारे व्हायरस पसरण्यापासून रोखणे हे आहे.

ओक रिज रिसर्चर मिकोलस स्मिथ यांनी सांगितले की, त्यांनी कोरोना व्हायरसची ओळख करणारे मॉडेल तयार केले.

अमेरिकेच्या उर्जा विभागने वर्ष 2014 मध्ये समिट कॉम्प्युटरवर काम करण्यास सुरूवात केली होती. हा कॉम्प्युटर सर्वात वेगवान लॅपटॉपपेक्षा 10 लाख पट अधिक शक्तीशाली आहे. संशोधक समिटद्वारे 77 रसायनांची ओळख केली होती, त्याद्वारे सर्वात चांगल्या मॉडेलचे निर्माण करेल.

Leave a Comment