मागील 50 वर्षांपासून लोक हँड सॅनिटायझरचा वापर करत आहेत. मात्र कोरोना व्हायरसमुळे याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलाला देखील हँड सॅनिटायझर कशासाठी आहे, हे माहिती आहे.
या महिलेने बनवला होता जगातील पहिला हँड सॅनिटायझर
रिपोर्टनुसार, हँड सॅनिटायझर आणि लिक्विड सोपची मागणी 400 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र हँड सॅनिटायझर बनविण्याची कल्पना कोणाची होती माहिती आहे ?
रिपोर्टनुसार, वर्ष 1966 मध्ये कॅलिफोर्नियातील बेकर्सफील्डच्या ल्यूप हेर्नानडेंझ यांना हँड सॅनिटायझरचे श्रेय दिले जाते. विद्यार्थी नर्स असलेल्या ल्यूप यांनी विचार केला की, साबण, सिंक आणि पाण्याद्वारे सहज हात कसे साफ करता येतील. याच्यातूनच हँड सॅनिटायजरचा शोध लागला असे म्हणावे लागले.
Lupe Hernandez (Inventor of hand sanitizer) pic.twitter.com/PyAsqPRr4I
— SJWJamesBond Wants Nazis Banned ︽✵︽ Agent of GIRL (@mvbrat91) March 18, 2020
जेव्हा त्यांनी अल्कॉहोलला जेलप्रमाणे हातावर फिरवले, त्यावेळी ते किटाणूंना मारते हे त्यांच्या लक्षात आले. अशाप्रकारे जगाला हँड सॅनिटायजर मिळाले.
Hand sanitizer was invented by a woman named Lupe Hernandez. For that, we are eternally grateful. #WomensHistoryMonth https://t.co/qzTUu62ly2
— Fordham University Libraries (@FordhamLibrary) March 18, 2020
Thankkkkk You Lupe Hernandez 👏🏼👏🏼👏🏼👏🏼. Remembering the Life-Saving Lupe Hernandez, Hand Sanitizer Inventor https://t.co/YjqkjKKZAD
— Jose (@Mr_Hernandez_81) March 19, 2020
आज कोरोना व्हायरसच्या निमित्ताने लोक हँड सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत व सोबतच ल्यूप हेर्नानडेंझ यांचे आभार मानत आहेत.
