कोरोना : शहर लॉक डाउन असल्याने वायू प्रदूषणात घट

कोरोना व्हायरसचा जगभरातील वाढता प्रसार पाहता अनेक देशातील शहरे लॉकडाउन करण्यात आली आहेत. याचा फायदा अनेक शहरातील प्रदुषणाची गुणवत्ता सुधारण्यास झाली आहे. क्वारंटाइनमुळे अनेक शहरातील वायू प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे. मात्र दीर्घकाळासाठी हा बदल झाला आहे, असे म्हणणे अतीघाई ठरेल.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने टिपलेल्या फोटोनुसार, फेब्रुवारी महिन्यात चीनमधील वुहान शहरातील नायट्रो डायोऑक्साईडचे प्रमाण घसरले आहे. नायट्रोजन डायोऑक्साईड गाड्या, औद्योगिक ठिकाण, थर्मल पॉवर स्टेशनमुळे निर्माण होतो.

मात्र यूरोपियन अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईएसए) फोटोमध्ये प्रदुषणात वाढ दिसते. ईएसएच्या फोटोमध्ये इटलीमधील वायू प्रदूषण देखील कमी झाल्याचे दिसत आहे. स्पेनच्या ब्राझिलोना आणि मॅद्रिदमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. नायट्रोजन डायोऑक्साईड हा एक दिवस हवेत असतो. यामुळे श्वसनासंबंधी गंभीर आजार होऊ शकतात.

याशिवाय जेथे लोक होम-क्वारंटाइन आहेत, जसे की अर्जेंटिना, बॅवारिया, बेल्जियम, कॅलिफोर्निया, फ्रान्स आणि ट्युनिशियामध्ये देखील प्रदूषण कमी झाले आहे.

मात्र नायट्रोजन डायोऑक्साईडचे प्रमाण कमी झाले, याचा अर्थ हवा स्वच्छ झाली असा होत नाही. पॅरिस मागील तीन दिवसांपासून बंद असले तरी हवेत प्रदुषणाचे कण आहेत.

Leave a Comment