महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे नवे 11 रुग्ण


मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11ने वाढून 63 वर गेल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असून यापैकी पुण्यात एक तर मुंबईत 10 नवीन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ठाकरे सरकारने कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून महाराष्ट्रातील चार मोठी शहरे अंशतः बंद केली आहेत. मुंबईतील लोकल आणि बस तुर्तास बंद होणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर 31 मार्च पर्यंत राज्यातील या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे. शिवाय, काम बंद राहिले तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कापू नये, आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Comment