आजपासून पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद


पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंदच्या आवाहनाला अर्धवेळ पाठिंबा पुण्यातील सर्व पेट्रोल पंप दुपारनंतर बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे.

पुणे शहरातील सर्व पेट्रोल पंप आजपासून दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या या निर्णयानुसार पुण्यातील सर्व पेट्रोल पंप हे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहतील. तर शहराबाहेरील पेट्रोलपंप हे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 या वेळेत सुरु राहणार आहेत. हे सर्व पंप 31 मार्चपर्यंत दुपारनंतर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास पेट्रोल पंपावर यावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

Leave a Comment