तुम्ही पाहिले आहे का ‘हंगामा २’चे नवे पोस्टर?


मिझान जाफरी, प्रणिता सुभाष, शिल्पा शेट्टी आणि परेश रावल अभिनीत ‘हंगामा २’ या कॉमेडी चित्रपटाचे नवे पोस्टर निर्मात्यांनी रिलीज केले आहे. चित्रपटातील कलाकार आकर्षक अशा दिसणाऱ्या या पोस्टरमध्ये मजेशीर पोजमध्ये दिसत आहेत. हे पोस्टर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवर शेअर केले आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० ला रिलीज होणार आहे.


शिल्पा शेट्टी- कुंद्रा, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष आणि परेश रावल यांच्या ‘हंगामा २’ या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘हंगामा’च्या पहिल्या भागात परेश रावल यांनी प्रियदर्शनसोबत काम केले होते. आता ते पुन्हा सात वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. रावल यांनी ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’ आणि ‘मालामाल विकली’ यासारख्या विनोदी चित्रपटात काम केले आहे.