काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार ज्योतिरादित्य सिंधिया ?


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीला गेले असून आज ते संध्याकाळीच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जोत्यिरादित्य सिंधिया हे दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात झालेल्या निवडणुकीत यश मिळवले खरे, पण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कमलनाथ यांना मुख्यमंत्री करणे हे चांगलेच भोवले आहे. कारण सत्ता स्थापन झाली तेव्हापासून ज्योतिरादित्य सिंधिया यांची नाराजी आहे. आता ज्याचा फायदा भाजप घेणार हे उघड आहे.

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतेच मध्यप्रदेश सरकार पाडण्यात आपल्याला काहीही रस नसल्याचे म्हटले आहे. तरीही भाजपला कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातल्या मतभेदांचा फायदा हा होणार हे स्पष्ट आहे. मध्यप्रदेशात भाजपकडे १०७ जागा असून १७ आमदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत आले तर भाजपची सत्ता मध्यप्रदेशात स्थापन होऊ शकते. आता मुख्यमंत्रीपदी ज्योतिरादित्य सिंधिया बसणार की शिवराज सिंह चौहान हे पुढच्या रणनीतीवरच ठरणार आहे.

Leave a Comment