बीबीसी वर्ल्ड हिस्ट्री मासिकाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये शीख साम्राज्याचे 19व्या शतकातील शासक महाराजा रणजीत सिंह यांना आतापर्यंतचे सर्वात महान नेते म्हणून निवडण्यात आले आहे. या सर्वेक्षणामध्ये 5 हजारांपेक्षा अधिक जणांनी भाग घेतला होता. एक नवीन सहिष्णू साम्राज्य उभारण्यासाठी 38 टक्के लोकांनी महाराजा रणजीत सिंह यांना मत दिले.
बीबीसीच्या सर्वेक्षणानुसार हे महाराज ठरले जगातील आतापर्यंतचे सर्वात महान नेते
बीबीसी वर्ल्ड हिस्ट्री मासिकाच्या सर्वेक्षणानुसार, 25 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आफ्रिकेतील स्वातंत्र्य सैनिक अमलक कॅब्राल हे आहेत. त्यांनी पोर्तुगिजांपासून देशाला मुक्त करण्यासाठी लोकांमध्ये प्रेरणा निर्माण केली.
ब्रिटनचे पंतप्रधान विंस्टन चर्चिल आपली त्वरित निर्णय घेण्याची क्षमता आणि वेगवान राजकीय डावपेचासाठी 7 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
बीबीसीने केलेल्या सर्वेक्षणात या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्रपती अब्राहम लिंकन हे चौथ्या, महाराणी एलिजाबेथ पाचव्या स्थानावर आहेत. या व्यतिरिक्त मुघल सम्राट अकबर, फ्रेंच सैन्य नेते जोन ऑफ वर्क आणि रशियन महाराणी कॅथरिन द ग्रेट यांचा समावेश आहे.
