पी.पी.ई किट्स आणि एन-१९ मास्क घेण्यासाठी घेऊन जावी लागणार डॉक्टरांची चिठ्ठी


मुंबई – चीनसह सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरल थैमान घालत आहे. आता या कोरोना व्हायरसने भारतात देखील प्रवेश केला असून कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण चीन आणि इतर देशांमध्ये आढळून आले आहेत. त्याचबरोबर भारतात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या संशयितांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

पण महाराष्ट्रात अद्यापही कोरोना व्हायरस लागण झालेला एकही रुग्ण आढलेला नाही आहे. तरी देखील देशांमध्ये वाढत असलेला संसर्ग लक्षात घेता, राज्यामध्ये विविध पातळ्यांवर कोरोना व्हायरसबाबत दक्षता घेण्याचा दृष्टीने राज्य शासनाने नियोजन सुरू केले आहे. कोरोना पासून बचाव करण्याकरिता सध्या पी.पी.ई किट्स आणि एन-१९ मास्क वापर केला जात आहे. हाच मास्क घेण्यासाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी असणे गरजेच आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषध दुकानातून पी.पी.ई किट्स आणि एन-९५ मास्कची विक्री होणार नाही, असा आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

दुकानदाराकडून या मास्कची विक्री करताना मूळ किंमती व्यक्तिरिक्त जादा दर आकारणी होत असल्याच निदर्शनास आले आहे. तसेच या मास्कची अनावश्यक खरेदी करून साठा होत असल्याच समोर आल्यामुळेच हे मास्क खरेदी करण्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले आहे.

Leave a Comment