
सध्या आपल्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे अवघ्या 23 वर्षी ‘शाळा’ चित्रपटाकरता राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेला दिग्दर्शक सुजय डहाके चर्चेत आला आहे. ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने सुजय डहाकेने एका दैनिकाला मुलाखत दिली. यामध्ये त्याने मराठी मालिकांमध्ये सगळ्या मुख्य भूमिकेतील अभिनेत्री या ब्राम्हणच का?’ असा सवाल विचारत त्याने छोट्या पडद्यावर गोंधळ घातला आहे.
मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राम्हण व्यतिरिक्त इतर जातीची अभिनेत्री का दिसत नाही?
ब्राम्हण व्यतिरिक्त इतर जातीच्या अभिनेत्री मराठी मालिकांमधील मुख्य भूमिकेत का पाहायला मिळत नाही? असा त्याने यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर यावेळी सुजय डहाकेने एक घडलेला प्रसंग देखील शेअर केला. तो म्हणाला की, मी स्वतः एका मिटिंगमध्ये होतो, त्यावेळी बॅकवर्ड मग ती लागू बंधूची जाहिरात कशी करणार? या रियालिटीमध्ये तुम्ही आहात.
मराठी मालिका क्षेत्रात सुजय डहाकेच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधानने सुजयच्या या वक्तव्यावर एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तेजश्री म्हणते की, मी ब्राम्हण नाही बर! CKP आहे… पण काम आहे माझ्याकडे आणि गेली ‘य’ वर्षं !! याला Talent म्हणूया का? तेजश्रीने दिलेल्या या उत्तरामुळे चर्चा वाढतच चालली आहे.
28 फेब्रुवारी रोजी सुजय डहाकेचा ‘केसरी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोल्हापूरच्या रांगड्या मातीतील कुस्तीवर आधारलेला असून या चित्रपटात महेश मांजरेकर वस्तादाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट कुस्तीतील ‘महाराष्ट्र केसरी’ या पुरस्काराच्या अवतीभवती फिरतो. चित्रपटात विराट मडके याची प्रमुख भूमिका आहे. सुजय डहाकेच्या हा चौथा चित्रपट आहे.
