यामुळे ट्यूबलेस टायर्स आहेत सर्वोत्तम

अनेकदा अचानक गाडीचे टायर पंक्चर झाल्याने समस्या निर्माण होत असते. खासकरून दुचाकी चालकांना तर याचा अधिक त्रास होतो. अचानक टायर पंक्चर झाल्याने गाडीचा बँलेंस देखील बिघडू शकतो. सध्या बाजारात ट्यूबलेस आणि ट्यूब असणारे टायर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही टायर्सच्या किंमतीमध्ये अधिक अंतर नाही. मात्र ट्यूबलेस टायर्सचे अधिक फायदे आहे.

ट्यूबलेस टायर्स –

या टायरच्या आत अथवा वेगळी कोणतीच ट्यूब नसते, म्हणून याला ट्यूबलेस टायर्स म्हटले जाते. हे वजनाला देखील हल्के असतात व वॉल्व रिमशी जोडलेले असतात. पंक्चर झाल्यावर या टायरमधून हवा हळूहळू बाहेर पडते.

मायलेज आणि परफॉर्मेंस –

ट्यूब असणाऱ्या टायर्सच्या तुलनेत ट्यूबलेस टायर्स अधिक हलके असतात. त्यामुळे ते अधिक चांगले मायलेज व परफॉर्मेंस देतात. ट्यूबलेस टायर्स लवकर गरम देखील होत नाही.

पंक्चर झाल्याने काहीही समस्या नाही –

चालत्या गाडीत ट्यूब असणारे टायर पंक्चर झाल्याने गाडीचा बँलेंस  बिघडतो व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. मात्र ट्यूबलेस टायर्ससोबत असे होत नाही. हे टायर्स लवकर पंक्चर होत नाहीत व चालत्या गाडीत पंक्चर झाले तरी बँलेस जात नाही. पंक्चर झाल्याचे चालकाला त्वरित कळत नाही.

ट्यूबलेस टायर्सचा योग्य वापर –

ट्यूबलेस टायर्सचे वय वाढवण्यासाठी टायर्सला नेहमी योग्य एअर प्रेशरवर ठेवावे. आठवड्यातून तीन वेळा एअर प्रेशर नक्की तपासावे. खराब रस्त्यावरून गाडी चालवण्यापासून वाचावे. यामुळे गाडीची परफॉर्मेंस देखील वाढेल व मायलेज देखील अधिक मिळेल. नेहमी ऑरिजनल टायर्सच खरेदी करावे.