
मुंबई – भारतात इटलीहून आलेले १५ पर्यटक कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आहे. यासंदर्भात डीडी न्यूजने दिलेल्या वृतत्तानुसार, दिल्लीला इटलीहून आलेले १५ जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झालं आहे. भारतात आल्यानंतर या पर्यटकांना वेगळे ठेवण्यात आले होते. यासर्वांची दिल्लीतील एम्समध्ये नमुन्यांची तपासणी केली असता हे सर्व कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. आयटीबीपी कॅम्पमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात या सर्वांना ठेवण्यात आले आहे.
इटलीहून भारतात दाखल झालेले १५ पर्यटक कोरोनाग्रस्त
दरम्यान महाराष्ट्रातही कोरोना या व्हायरसची दहशत पसरली आहे. कारण नाशिकमध्ये आता कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी कोरोनाचे रुग्ण दिल्ली, तेलंगणामध्ये आढळले होते. आता नाशिकमध्ये कोरोना संशयित रुग्ण आढळून आला आहे. कोरोना व्हायरसची लक्षणे एका व्यक्तीमध्ये दिसून आल्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कोरोनाचे दोन संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून मुंबई आणि पुण्यातील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
