अखेर व्हॉट्सअ‍ॅपचे बहुप्रतिक्षित ‘डार्क मोड’ फीचर लाँच

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने अखेर डार्क मोड फीचर जारी केले आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्राईड प्लॅटफॉर्मवर जारी करण्यात आले आहे. लवकरच सर्व युजर्ससाठी हे अपडेट रोल आउट केले जाईल.

अनेक महिन्यांपासून या फीचरचे टेस्टिंग सुरू होते. काही दिवसांपुर्वीच कंपनीने या फीचरचा काळ्या रंगातील एक लोगो देखील लाँच केला होता. नवीन लोगोची माहिती व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे.

कंपनीने ट्विटर या फीचरचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

या फीचरमुळे युजर्सला अंधारात देखील व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणे शक्य होईल. यामुळे डोळ्यांवर जास्त परिणाम होणार नाही. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे बॅकग्राउंड पुर्णपणे काळे असेल.

जर तुम्ही आयओएस 13 आणि अँड्राईड 10 वापरत असाल तर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डार्क मोड फीचर आपोआप स्विच होईल. जर तुम्ही अँड्राईड 9 वापरत असाल तर यासाठी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्समध्ये Theme या पर्यायावर क्लिकरून डार्क मोड सुरू करावे लागेल.

Leave a Comment