शिवसेनेच्या उपनेतेपदी सचिन अहिर यांची नियुक्ती


मुंबई – विधानसभा निवडणुकाअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांची आता शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सचिन अहिर यांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.


आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे यांनी, माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल असा मला विश्वास असल्याचे म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या ट्विटला रिट्वीट करत सचिन अहिर यांनी ‘मला दिलेला पाठिंबा आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.