ताशी 7 कोटींची कमाई करत मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


नवी दिल्ली – ‘हुरुन ग्लोबल रिच 2020ने (Hurun Global Rich List 2020) नुकतीच आशिया व भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले आहे. 3 नवीन अब्जाधीश भारतात प्रत्येक महिन्याला निर्माण होतात. मुकेश अंबानी आशिया खंडातील तसेच भारतातील सर्वात श्रीमंताच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत.

हरुन ग्लोबल रिच लिस्ट 2020 च्या अहवालानुसार, मुकेश अंबानी जगातील 9 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 6 हजार 700 कोटी डॉलर अंबानींची एकूण मालमत्ता आहे. मुकेश अंबानी यांनी 2019 मध्ये दर तासाला 7 कोटी रुपये कमावले आहेत. सध्या भारतातील अब्जाधीशांची संख्या 138 झाली आहे. तसेच सर्वात जास्त अब्जाधीशांच्या यादीच्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकावर आला असल्यामुळे भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढून 170 झाली आहे. सध्या सर्वाधिक अब्जाधीश चीन आणि अमेरिकेत असून यात भारताचा तिसरा क्रमांक आहे.

भारतातील 138 अब्जाधीशांपैकी सर्वात जास्त 50 अब्जाधीश हे मुंबईचे आहेत. तसेच यातील 30 अब्जाधीश हे दिल्ली तर 17 अब्जाधीश हे बंगळुरू येथील आहेत. अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस जगात सर्वात श्रीमंताच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत. मुकेश अंबानी यांच्यानंतर भारतात सर्वोत श्रीमंताच्या यादीत हिंदुजा परिवारचा क्रमांक लागतो. हिंदुजा परिवाराची एकूण संपत्ती 2700 कोटी डॉलर ऐवढी आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी यांचे नाव आहे. अदानी यांची संपत्ती 1700 कोटी डॉलर आहे.

Leave a Comment