
वॉशिंग्टन – बीएनपी परिबास ओपनमध्ये माजी अव्वल आणि चार वेळा ग्रँड स्लॅम विजेती महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली आहे. मागील वर्षी निवृत्तीनंतर टेनिसमध्ये परतलेली किम तिसरी स्पर्धा खेळणार आहे. तिने ही स्पर्धा २००३ आणि २००५ मध्ये जिंकली होती. ही स्पर्धा यंदा ९ मार्चपासून सुरू होणार आहे.
टेनिस स्पर्धेत तीन मुलांच्या आईची वाइल्ड कार्ड ‘एन्ट्री’
दुबई ओपनच्या पहिल्या फेरीत तब्बल आठ वर्षांच्या विश्रांतीनंतर प्रथमच टेनिस कोर्टवर धडक मारणार्या महिला टेनिसपटू किम क्लाइस्टर्सला पराभवाचा सामना करावा लागला. किमला स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाने बेल्जियमच्या ६-२, ७-६ असे नमवले. तिने २००७ मध्ये गरोदर असताना निवृत्ती घेतली होती. पण तिने दोन वर्षांनी पुनरागमन करत २०१० मध्ये यूएस ओपनला गवसणी घातल्यानंतर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पटकावल्यानंतर तिने परत एकदा निवृत्ती घेतली होती.
