६४ टनी हनुमानाची भिलवाडा ते प्रयागराज यात्रा


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
राजस्थानातील भिलवाडा येथून उत्तरप्रदेशातील प्रयागराज या हजार किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या यात्रेसाठी निघालेले ६४ टनी हनुमान गुरुवारी प्रयागराज येथे पोहोचले. भिलवाडाच्या संकटमोचन हनुमान मंदिराचे महंत बाबूगिरी यांना स्वप्नात हनुमानानी प्रयागराजला ने असा आदेश दिला होता त्यानुसार ही यात्रा केली गेल्याचे समजते.


संकटमोचन हनुमान प्रतिमा एका अखंड शिळेतून बनविली गेली असून तिचे वजन ६४ टन आहे. ही प्रतिमा २८ फुट लांब आणि १२ फुट रुंद आहे. ६० फुट लांबीच्या ट्रॉलीवरून तिचा प्रयागराज प्रवास सुरु झाला तेव्हा प्रतिमा ट्रॉलीवर चढविण्यास ८ तास लागले. ९ फेब्रुवारी रोजी हा प्रवास सुरु झाला आणि १८ दिवसांनंतर ही प्रतीमा प्रयागराज येथे गुरुवारी पोहोचली. शुक्रवारी वैदिक मंत्रोचार करून गंगाजल, दुध आणि दही घालून मूर्तीला अभिषेक केला गेला. यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि महंत बाबू गिरी यांनी प्रतिमेचे पूजन केले.

प्रतिमेचे वजन लक्षात घेऊन संगम घाटावर न जाता ती बांधस्थित लेटे हनुमान मंदिराशेजारी ठेवली गेली आहे. ही प्रतिमा पुन्हा भिलवाडा येथे नेली जाणार असून २१०० किमीचा हा संपूर्ण प्रवास १ महिन्यात करण्याचा संकल्प केला गेला आहे.

Leave a Comment