जगभरात लोकप्रिय असलेली रियालिटी स्टार आणि सोशलाइट किम कार्दशियनच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये कार्दशियनसोबत हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शअर (Cher) दिसत आहे. किम कार्दशियन आणि शअरची स्टाईल शानदार आहे. मात्र या फोटोची खास गोष्ट म्हणजे शअर 73 वर्षीय आहे पण कोणत्याच गोष्टीत कार्दशियनपेक्षा कमी दिसत नाही.
73 वर्षीय अभिनेत्रीने किम कार्दशियनला अशी दिली टक्कर
शअर आणि किम कार्दशियनने हा फोटोशूट एका मॅग्झिनसाठी केला असून, दोघींच्या या फोटोला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हा फोटो शेअर करताना कार्दशियनने लिहिले की, शअर सोबत कव्हरवर. शअर माझ्यासाठी स्टाईल आयकॉन आहे, त्यामुळे ही शुटिंग एखादे स्वप्न खरे होण्यासारखेच आहे. सेटवर माझी अन्य स्टाइल आयकॉन नाओमी देखील उपस्थित होती. तुमच्यासोबत हे फोटो शेअर करताना मला आनंद होत आहे.
शअर हॉलिवूड अभिनेत्री, गायक आणि टेलिव्हिजन पर्सनॅलिटी आहे. तिला गॉडेस ऑफ पॉप नावाने देखील ओळखले जाते.
