वैज्ञानिकांनी शोधला श्वास न घेता जिंवत राहणारा जीव

कोणत्याही जिवंत वस्तूला जगण्यासाठी श्वास घेणे गरजेचे असते. मात्र वैज्ञानिकांनी आता असा जीव शोधला आहे, जो श्वास घेत नाही. वैज्ञानिकांनी जेलीफिश सारखा दिसणारा हा एक जीव शोधला आहे.

हा पहिला असा बहुपेशीय जीव आहे, ज्यात मायक्रोकॉन्ड्रियल जीनोम नाही. याच कारणामुळे या जीवाला जिवित राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागत नाही. लाल रक्तपेशी सोडून मानवाच्या सर्व पेशींमध्ये मोठ्या संख्येत मायट्रोकॉन्ड्रिया आढळतात. ज्या श्वास घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

या जीवाला इस्त्रायलच्या तेल अवीव यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी शोधले आहे. याचे वैज्ञानिक नाव हेन्नीगुया साल्मिनीकोला आहे. या शोधाचे प्रमुख डयाना याहलोमी यांच्यानुसार, हा जीव मनुष्य व इतर जिवित प्राण्यांसाठी आजिबात धोकादायक नाही.

Image Credited – sciencealert

संशोधक डोरोथी ह्युचन म्हणाले की, हा जीव कसा विकसित झाला हे अजून एक रहस्यच आहे. हा जीव साल्मन फिशमध्ये आढळतो. माशापासून त्याला कोणतेही नुकसान न पोहचवता उर्जा प्राप्त करतो. दोघांच्या मधे असे नाते आहे, ज्याद्वारे कोणालाही नुकसान पोहचत नाही. जोपर्यंत मासा जिवंत असतो, तोपर्यंत हा जीव देखील जिंवत असतो.

या जीवावर संशोधन करताना वैज्ञानिकांनी याला फ्लोरेसेंट मायक्रोस्कोपद्वारे पाहिले. यावेळी हिरव्या रंगाचे न्यूकिल्कस दिसले, मात्र मायटोकॉन्ड्रियल डीएनए आढळले नाहीत.

असेच एक प्रकरण 2010 मध्ये समोर आले होते. इटलीच्या पॉलिटेक्निक यूनिवर्सिटीचे संशोधक रॉबर्टो डेनोव्होरो यासारखाच मिळता-जुळता जीव शोधला होता.

Leave a Comment