
पुन्हा एकदा ‘बागी ३’ चित्रपटात अॅक्शन अवतारात बॉलिवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ दिसणार आहे. या चित्रपटाची मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चित्रपटाचे शूटिंग अलिकडेच पूर्ण झाले असून या चित्रपटाचे पहिले पोस्टरही आता रिलीज करण्यात आले आहे. टायगर श्रॉफचा दमदार लुक यामध्ये पाहायला मिळतो. या चित्रपटाचे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच, या चित्रपटाचा ट्रेलर ६ फेब्रुवारीला रिलीज करण्यात येणार आहे.
‘या’ दिवशी रिलीज होणार ‘बागी ३’चा ट्रेलर
Trailer drops on 6 Feb 2020… New poster of #Baaghi3… Stars #TigerShroff, #ShraddhaKapoor and #RiteishDeshmukh… Directed by Ahmed Khan… Produced by #SajidNadiadwala… Co-produced by Fox Star Studios. pic.twitter.com/OJ9Lt6qDTP
— taran adarsh (@taran_adarsh) February 3, 2020
आपल्या अभिनयासोबत डान्स आणि फिटनेससाठी टायगर ओळखला जातो. तो तरुणाईसाठी फिटनेस आयकॉन असल्यामुळेच त्याचा दमदार फिटनेस ‘बागी ३’ मध्येही पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बागी’ आणि ‘बागी २’ चित्रपटातील भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे ‘बागी ३’ साठीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. ‘बागी’मध्ये श्रद्धाने त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखचीही मुख्य भूमिका आहे. तर, यामध्ये जॅकी श्रॉफ यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. तर, साजिद नादियाडवालाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
