टिव्ही चॅनेल्सच्या टॅरिफ प्लॅनमध्ये लवकरच होऊ शकतो फेरबदल !

मोबाईलच्या प्रीपेड प्लॅनंतर आता टिव्ही चॅनेल्सच्या किंमतीमध्ये देखील बदल होऊ शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (ट्राय) नवीन टॅरिफ ऑर्डर अंतर्गत डीटीएच कंपन्यांना 15 जानेवारीपर्यंत नवीन प्लॅन्स लागू करण्याचे आदेश दिले होते. मात्र डीटीएच कंपन्यांनी ट्रायच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. या बाबतची सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे. न्यायालयाच हा निर्णय ट्रायच्या बाजूने लागल्यास कंपन्यांना नवीन टिव्ही चॅनेल पॅक सादर करावे लागतील.

जर निर्णय ट्रायच्या बाजूने लागला तर डीटीएच कंपन्यांसोबतच टिव्ही ऑपरेटर्सला देखील 12 फेब्रुवारीनंतर नवीन टिव्ही चॅनेल पॅक लाँच करावे लागतील. कंपन्यांच्या बाजूने निर्णय लागल्यास कंपन्यांना नवीन प्लॅन सादर करण्यास वेळ मिळेल.

कंपन्यांना 15 जानेवारीपर्यंत प्लॅन सादर करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र प्रकरण न्यायालयात पोहचल्याने चॅनेल पॅक्सच्या लाँचिंग थांबवण्यात आले आहे.

Leave a Comment