24 तासात केरळमध्ये आढळला ‘कोरोना’चा तिसरा रुग्ण


तिरुवअनंतपुरम: कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण केरळमध्ये आढळला असून कोरोना व्हायरसची लागण झालेला हा आतापर्यंतचा केरळमध्ये तिसरा रुग्ण ठरला आहे. याआधी कोरोना व्हायरसची चीनमधून परतलेल्या एका विद्यार्थिनीला लागण झाली होती. या रुग्णाला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने चीनमधून परतलेल्या भारतीयांना स्वतंत्र कक्षात ठेवण्याची सूचना केली असून त्याचबरोबर केंद्र सरकारने चीनला जाणे टाळण्याचेही आवाहन केले आहे.

काही दिवसांपूर्वी चीनहून परतलेल्या केरळमधील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. कोरोना व्हायरसची लागण झालेला हा भारतातील दुसरा रुग्ण होता. काही तास या घटनेला उलटत नाही तोच आता पुन्हा एक रुग्ण आढळला आहे. रुग्णालयात त्याला दाखल केले असून विशेष देखरेखीखाली त्याला ठेवण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची रुग्णाला लागण झाली असून रुग्णालयातील विशेष विभागात त्याला ठेवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. केरळमध्ये याआधीही कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण आढळला होता.

Leave a Comment