दीपिकाच्या समर्थनार्थ सोनाक्षी सिन्हाचे ट्विट


बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण मंगळवारी जेएनयूमध्ये हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाली. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने त्यावरून दीपिकाचे समर्थन केले आहे. दीपिकाने विद्यार्थ्यांची घेतलेली भेट कौतूकास्पद असून ही वेळ शांत बसण्याची नसल्याचे आपल्या ट्विट केले आहे.

तुमचा पाठींबा कोणत्या पक्षाला आहे. या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. हिंसेचे तुम्ही समर्थन का करता?, तुम्हाला विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची रक्ताने माखलेली छायाचित्रे विचलित करत नाहीत का?, विद्यार्थ्यांची दीपिकाने घेतलेली भेट कौतूकास्पद आहे. हातावर हात ठेऊन शांत बसण्याची ही वेळ नसल्याचेही सोनाक्षीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


रविवारी संध्याकाळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका नुकतीच दिल्ली पोहोचली होती. यादरम्यान मंगळवारी दीपिका जेएनयूच्या समर्थनार्थ उतरली आणि विद्यार्थी संघाच्या अध्यक्षाला भेटली. या भेटीनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले असून एक गट दीपिकाला पाठींबा देत आहे. तर दुसरा गट दीपिकाचा विरोध करत छपाकवर बहिष्कार टाकण्याची भाषा करत आहे.

Leave a Comment