अमेरिकेची ही 5 शस्त्रास्त्र आहेत सर्वात घातक

जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील सर्वात बलाढ्य देश असलेल्या अमेरिकेकडे अनेक अशी शस्त्रास्त्र आहेत, ज्यांच्या बळावर त्यांनी अनेक युद्धे जिंकली आहेत. ज्या काळात या शस्त्रांचा शोध लागला तेव्हा तर इतर देशांचा थरकाप उडत असे. याचे उदाहरण म्हणजे अमेरिकेने जापानच्या हिरोशिमी-नागासाकीवर केलेला अणुबॉम्ब हल्ला. अमेरिकेकडे असलेल्या अशाच 5 खतरनाक शस्त्रांविषयी जाणून घेऊया.

Image Credited – History

द गॅटलिंग गन –

अमेरिकेतील गृहयुद्धाच्या काळात या मशीनगनचा वापर करण्यात आला होता. ही पहिली रॅपिड फायर गन आहे. ही गन अमेरिकेचे वैज्ञानिक रिचर्ड गॅटलिंगने तयार केली आहे. सुरूवातीच्या बंदुकीद्वारे एका मिनिटात 350 गोळ्या झाडण्याची क्षमता होती.

यानंतर या बंदुकीला अधिक विकसित केल्यानंतर यातून एकाच वेळी 400 गोळ्या डागण्याची क्षमता आहे. नंतर गॅटलिंग गनची जागा ‘द मॅग्झिम मशीनगन’ने घेतली. प्रथम विश्वयुद्धात या गनने आहाकार उडवला होता.

Image Credited – newsweek

अणुबॉम्ब –

द्वितीय विश्वयुद्धादरम्यान अमेरिकेने अणुबॉम्ब विकसित केला होता. 1939 च्या या योजनेला ‘मॅनहट्टन प्रोजेक्ट ‘नाव देण्यात आले होते. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने अणुबॉम्बद्वारे जपानची हिरोशिमा-नागासाकी ही शहरे उद्धवस्त केली होती.

या बॉम्बची निर्मिती जे रॉबर्ट ओपेनहाइमर यांनी केली. त्यांना ‘फादर ऑफ एटॉमिक बॉम्ब’ असेही म्हटले जाते.

Image Credited – Amarujala

प्रिसीजन गाइडेड शस्त्र –

ही अशी शस्त्र असतात, जी आधीपासूनच निश्चित केलेल्या लक्ष्यावर अचूक हल्ला करतात. 70च्या दशकात अमेरिकेने अशी अनेक शस्त्रे निर्माण केली. 1943 मध्ये अमेरिकेने जर्मनीच्या बॉल-बिअरिंग प्लांट्सवर 400 बी-17 बॉम्बचा वर्षाव केला होता. व्हियनतान युद्धादरम्यान देखील अमेरिकेने अनेक लेझर गाइडेट शस्त्रांचा वापर केला.

Image Credited – Amarujala

स्टेल्थ –

स्टेल्थचा अर्थ लपूनछपून हल्ला होय. 1960-70 मध्ये रशियाने जेव्हा जमिनीवरून हवेत मारा करण्याचे तंत्र विकसित केले, त्यावेळी अमेरिकेने ‘स्टेल्थ’ तंत्र शोधले.

रशियाचे वैज्ञानिक या तंत्राचा शोध घेत असतानाच अमेरिकेचे वैज्ञानिक डेनिस ओव्हरहोल्सर यांनी हे तंत्र विकसित करून रशियाच्या आधी स्टेल्थ विमान तयार केले. ज्याचे नाव होपलेस डायमंड होते.

होपलेस डायमंडच नंतर लॉकहीड एफ-117 लढाऊ विमानात विकसित करण्यात आले. हे जगातील पहिले ऑपरेशनल स्टेल्थ एअर क्राफ्ट होते. हे विमान रडारच्या कक्षेत येत नाही.

Image Credited – Amarujala

ड्रोन्स –

1990 मध्ये एमक्यू-1 प्रीडेटर नावाचे खतरनाक ड्रोन तयार करण्यात आले. ज्याने युद्धाची परंपराच बदलून टाकली. यानंतर पुढील 15 वर्षात अमेरिकेने मानवरहित विमान बनवण्यामध्ये मोठे यश मिळवले. एमक्यू-9सी रीपर, नॉर्थरोप ग्रुमेन एक्स-47बी ड्रोन तयार करण्यात आले. हे एक फायटर जेट आहे, ज्याला वैमानिक उडवत नाही. तर ते रिमोटच्या साहय्याने कंट्रोल केले जाते. इराणचे सैन्य कमांडार सुलेमानी यांना मारण्यास अमेरिकेने ड्रोनचाच वापर केला होता.

Leave a Comment