
नवी दिल्ली – हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि ३० ते ४० विद्यार्थी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आयशी घोष आणि इतर 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आयशी घोषसह 19 जणांविरोधात जेएनयू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल
पोलिसांनी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष आणि इतर 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणे, विद्यापीठाच्या सर्व्हर रुमची तोडफोड करण्याच्या कारणामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासनाने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई झाली.
