… म्हणून ऑस्ट्रेलियाने दिले 10 हजार उंटाना मारण्याचे आदेश

ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीने 50 कोटींपेक्षा अधिक वन्य प्राण्यांचा जीव घेतला आहे. या आगीचा सर्वात मोठा परिणाम कोआला प्राण्यांवर पडला आहे. त्यांची संख्या अर्धी झाली आहे. प्राण्यांना वाचवण्यासाठी आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे. आता ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी अधिक पाणी पित असल्या कारणाने 10 हजार जंगली उंटांना मारण्याचे आदेश दिले आहेत.

देशातील दुष्काळाच्या समस्येशी निपटण्यासाठी हजारो उंटांना मारण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाचे म्हणणे आहे की, हे उंट अधिक पाणी पितात. ज्यामुळे त्यांना प्रोफेशनल शूटर हॅलिकॉप्टरद्वारे मारतील. हे आदेश दक्षिण आदिवासी क्षेत्रातील आदिवासी नेत्यांनी दिला आहे.

लोकांची तक्रार आहे की, पाण्याच्या शोधात जंगली प्राणी त्यांच्या भागात शिरतात. याशिवाय अधिकाऱ्यांनी ही देखील चिंता आहे की हे प्राणी ग्लोबल वॉर्मिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. हे उंट वर्षाला एक टन कार्बन डायोक्साइड एवढ्या मिथेन गॅसचे उत्सर्जन करतात.

10 हजार उंटाना 5 दिवसाच्या आत मारण्यात येणार आहे. पेस्ट कंट्रोल केले नाही तर या जंगली उंटांची संख्या प्रत्येकी 9 वर्षांनी दुप्पट होईल.

 

Leave a Comment