
बॉलीवूडमध्ये अभिनेता आमिर खान हा आपल्या अभिनयामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत अनेक दमदार चित्रपट आमिर खानने केले असल्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी आमिर खान प्रचंड मेहनत घेत असतो. त्यामुळे त्याचे प्रत्येक चित्रपट हीट ठरतात. आता भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्याच्या यादीतमध्ये आमिर खानचा समावेश झाला आहे.
एका जाहिरातीसाठी तब्बल एवढे मानधन घेतो मिस्टर परफेक्शनिस्ट
बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्यांपैकी आमिर खान एक आहे. आता एका उत्पादनांच्या जाहिरातींसाठी आमिर खान तब्बल 11 कोटी रुपये मानधन घेतो. तसेच चित्रपटासाठी मानधनापेक्षा तो प्रॉफिट शेअरिंगला प्राधान्य देतो. आमिर खान एखाद्या चित्रपटाच्या नफ्यातील 70 टक्के हिस्सा घेतो.
आमिर खान हा एक उत्तम अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. आमिरने 1973 साली आलेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर 1984 सालच्या ‘होली’ या चित्रपटामध्येही महत्त्वाची भूमिका केली आहे. आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याला या चित्रपटात प्रचंड यश मिळाल्यानंतर आमिरने दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. त्याने 2012 मध्ये ‘सत्यमेव जयते’ या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.
