सोशल मीडियात व्हायरल होत आहे लक्ष्याच्या मुलीचा चर्मिंग लुक


मराठी सिनेसृष्टीतील लक्ष्मीकांत बेर्डे हे लोकप्रिय नाव. या दिग्गज कलाकाराने मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला होता. आपल्या अभिनयाने सगळ्यांना निखळ लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आनंद दिला. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटनंतरही ते चित्रपटाच्या माध्यमातून अजरामर झाले आहे.


आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आपले मनोरंजन करत आहेतच. पण अभिनय क्षेत्रात आता त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे देखील उतरला आहे. प्रेक्षकांना त्याच्या अभिनयाने पुन्हा एकदा लक्ष्मीकांत यांची आठवण करून दिली. त्या पाठोपाठ आता लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे देखील सिनेसृष्टीत पदार्पण करेल असेच काहीसे चित्र सध्यातरी दिसत आहे.


आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वानंदीने बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. तिने या फोटोंमध्ये काळ्या रंगाचा स्कर्ट टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोत तिचा अतिशय ग्लॅमरस लूक दिसत आहे. तिच्या या फोटोंवर खूप कमेंट आणि लाईक्स मिळत आहे. स्वानंदी यात डॅनिअल वेलिंगटन या घड्याळ्याची जाहिरात करताना दिसत आहे.


या आऊटफिटचे तीन फोटो आपल्या इंस्टाग्रामवर स्वानंदीने शेअर केले आहेत. पण तिचे हे अकाऊंटच खास आहे. यावर स्वानंदीचे अतिशय सुंदर असे फोटो आहेत.

View this post on Instagram

Stay wavy, baby! The ocean has my heart❤

A post shared by Swanandi L Berde (@swanandiberde) on


आपल्या आई-वडिलांप्रमाणे स्वानंदी देखील चाहत्यांना भरपूर आनंद देईल यात शंका नाही. ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत स्वानंदी पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेळेकर यांनी केले आहे.

Leave a Comment