जगातील सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच

सध्या अनेक कंपन्या आपला फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. सर्वात प्रथम सॅमसंगने गॅलेक्सी फोल्ड बाजारात आणला. त्याची किंमत 1 लाख 64 हजार रुपयांपर्यंत आहे. याशिवाय आता जगातील सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन देखील बाजारात दाखल झाला आहे.

(Source)

या फोनचे नाव इस्कोबार फोल्ड 1 ( Escobar Fold 1 ) असे आहे. या फोनची किंमत 349 डॉलर (24,971 रुपये) आहे. यावर कंपनीचे म्हणणे आहे की, या फोनमुळे लोकांचे हजारो रुपये वाचतील व त्यांना स्वस्त स्मार्टफोन मिळेल.

(Source)

इस्कोबार फोल्ड 1 च्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. दमदार परफॉर्मेंससाठी यात 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 16 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा सेंकडरी कॅमेरा मिळेल.

(Source)

या फोनमध्ये 7.8 इंचचे दोन डिस्प्ले देण्यात आलेले आहेत. हे डिस्प्ले उघडून टॅब प्रमाणे वापर करता येईल. फोन ड्युअल सिम सपोर्ट आहे. हा फोन दिसायला ह्युएईच्या मेट एक्स प्रमाणेच आहे. या फोनबद्दल सांगण्यात येत आहे की, हा कधीच तुटणार नाही.

Leave a Comment